घर पालघर विरारमध्ये यंदाही ‘विराट दहीहंडी महोत्सव

विरारमध्ये यंदाही ‘विराट दहीहंडी महोत्सव

Subscribe

हा उत्सव विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा होत असल्याने या ‘दहीहंडीला शहरात मानाचे स्थान आहे. दरवर्षी दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.

वसईः बहुजन विकास आघाडी पुरस्कृत विराट मित्र मंडळ आणि विराट फाउंडेशन यांच्यावतीने यंदाही ‘विराट दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विरार पश्चिम-विराट नगर येथील कै. भास्कर वामन ठाकूर भाजी मंडईशेजारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळात हा उत्सव हजारो नागरिक व गोविंदांच्या सहभागात पार पडेल, अशी माहिती आयोजक तथा माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी दिली. या उत्सवाचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. या दहीहंडी उत्सवात दरवर्षी वसई तालुक्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे पुरुष व महिला गोविंदा पथके उत्स्फूर्त सहभाग नोंदवत असतात. हा उत्सव विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा होत असल्याने या ‘दहीहंडीला शहरात मानाचे स्थान आहे. दरवर्षी दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.

शिवाय परिसरातील आर्थिक असहाय्य गरीब-गरजू शालेय विद्यार्थांना वह्या पुस्तके तसेच आर्थिक सहाय्य देण्याचे काम आयोजकांच्या माध्यमातून नियमित सुरू असते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वसई-विरार शहराला नावलौकिक प्राप्त करून देणार्‍या व्यक्तींचाही या व्यासपीठावर सन्मान करून आदर राखला जातो. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कामही मंडळाच्या माध्यमातून प्राधान्याने केले जाते. आरोग्य व रक्तदान शिबिरे अशा सामाजिक कार्यांतही या मंडळांचे योगदान आहे. यंदाही या उत्सवात सव्वाशे ते दीडशे किंबहुना त्याहून जास्त गोविंदा पथके सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी मंडळाच्या वतीने सर्वतोपरी काळजी घेण्यात आलेली आहे. विशेषत: गोविंदांच्या संरक्षणासाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट व अन्य साहित्यासह कार्यकर्त्यांची मोठी फौज तैनात असणार आहे. उत्सवात सहभागी गोविंदा पथकांसाठी रुग्णवाहिका सेवा, पिण्याचे पाणी इत्यादी व्यवस्थाही असणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -