Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरVivanta Virar : विवांता हॉटेल नोटा प्रकरण: चौघांना अटक

Vivanta Virar : विवांता हॉटेल नोटा प्रकरण: चौघांना अटक

Subscribe

तसेच या प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आली आहे. तर बेकायदेशीर प्रवेश आदी ५५ जणांची नावे निष्पन्न करण्यात आली असून ३० जणांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.

विरार : विरार नालासोपारा लिंक रोडवर असलेल्या विवांता हॉटेलमध्ये १९ नोव्हेंबर रोजी नोटा प्रकरण राज्यभर गाजले. या प्रकरणात तुळींज पोलिसांनी कठोर चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विवांता हॉटेलचे मालक याच्यावर देखील अमेरिकन नागरिक बेकायदेशीर रित्या वास्तव्य करत असल्याच्या आरोपावरून भारतीय नागरिक सुविधा २०२३ चे कलम १६३/२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आली आहे. तर बेकायदेशीर प्रवेश आदी ५५ जणांची नावे निष्पन्न करण्यात आली असून ३० जणांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.

विरारच्या विवांता हॉटेलमध्ये मंगळवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी नोटा वाटप आरोपाचे नाट्य राज्यभर रंगले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मतदारांना नोटांचे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी हॉटेलमध्ये प्रवेश करून गोंधळ घातला होता. यावेळी तावडे यांना साडेचार तास डांबून ठेवण्यात आले होते. भाजपचे नेते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बविआचे कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये शिरले होते. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी मोहसिन शेख, हिदायद याकूब मेनन, विशाल जाधव आणि मुझाहिद शेख या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण ५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी ३० जणांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी दिली.

- Advertisement -

तसेच मंगळवारी तुळींज पोलिसांनी हॉटेलचालकावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलच्या खोली क्रमांक ४१५ मध्ये अमेरिकन नागरिक वास्तव्यासाठी आला होता. मात्र त्याची माहिती ‘सी’ अर्ज भरून स्थानिक पोलिसांना कळविण्यात आली नाही. याप्रकरणी विवांता हॉटेलचा व्यवस्थापक सोनू झा (२६) चालक सुरेश शेट्टी आणि रत्नाकर शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -