HomeपालघरVvmc: विनापरवानगी जाहिराती लावणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

Vvmc: विनापरवानगी जाहिराती लावणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

Subscribe

त्यानंतर पालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून शहरातील नऊ प्रभागांत अनधिकृत जाहिराती लावणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नऊ प्रभागातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.

विरार : वसई -विरार शहरात अनधिकृतरीत्या जाहिराती फलक लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले होते. या संदर्भात आपलं महानगर वृत्तपत्रात अशा जाहिराती लावणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी,या संदर्भात वृत्त छापण्यात आले होते.त्यानंतर पालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून शहरातील नऊ प्रभागांत अनधिकृत जाहिराती लावणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नऊ प्रभागातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.

वसई- विरार शहरात रस्त्याच्या कडेला फुटपाथवरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडांना जाहिराती बॅनर लावून प्रसिद्धी मिळवण्याचे काम शहरात जोमात चालू होते. यामुळे शहर विद्रूप दिसू लागले होते. नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने अनधिकृत जाहिराती लागल्यामुळे विद्रूपीकरण आले होते.त्यामुळे पालिकेने या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून विनापरवानगी होर्डिंग्ज,बॅनर किंवा भिंती रंगवून जाहिराती करू नये,तसे केल्यास सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल,अशी ताकीद दिली आहे.पालिका कार्यक्षेत्रात विनापरवानगी जाहिराती आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी पालिकेला देण्यासाठी पालिकेने प्रभाग अधिकारी आणि आणि नोडल अधिकारी (जाहिरात )यांचे संपर्क क्रमांक देखील उपलब्ध करून दिले आहेत.तसेच अशा जाहिरातींची माहिती छायाचित्रे पाठवण्यासाठी पालिकेने www.vvcmc.in हे संकेतस्थळ देखील उपलब्ध करून दिले आहे.


Edited By Roshan Chinchwalkar