वाडा: तालुक्यातील कुडूस येथे एका तरूणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला वाडा पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.ही घटना बुधवारी दि.18 रोजी गाळाचा पाड्यातील जंगलात सायंकाळच्या सुमारास घडली.या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुडूस येथे सदरची तरूणी राहत असून ती शिक्षण घेत आहे.तरूणीचे वडील तिला भेटण्यासाठी कुडूस येथे आले होते.तरूणीच्या गावातील तरूणही तिथे दुचाकीवरून आला होता. मी तुम्हाला घरी सोडतो असे सांगून त्याने दोघांना गाडीवर बसवले आणि त्यानंतर गावाच्या जवळपास नेल्यानंतर त्याने तरूणीच्या वडिलांना अर्ध्या रस्त्यावर सोडून त्यांना शॉर्टकट रस्त्याने घरी जाण्यास सांगितले. तरूणीला मोटारसायकलवर त्याने पैसे आणायचे आहेत असा बहाणा करून तरूणीला तिच्या घरी घेऊन न जाता गाळाचा पाड्यातील जंगल झाडांमधील कच्चा पाय वाटेने घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केला आणि असे तक्रारीत म्हटले आहे. हे कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारू अशी धमकी देऊन तरूण पळून गेला. त्यानंतर तरूणीने थेट पोलीस ठाणे गाठून घडलेली घटना पोलिसांना सांगितली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.
Wada News: वाडा तालुक्यात तरूणीवर अत्याचार
written By My Mahanagar Team
wada