Eco friendly bappa Competition
घर पालघर वाढवण बंदर विरोध, ३ सप्टेंबरला मच्छीमारांचा  मोर्चा

वाढवण बंदर विरोध, ३ सप्टेंबरला मच्छीमारांचा  मोर्चा

Subscribe

३ सप्टेंबर रोजी हजारोंच्या संख्येने मच्छीमार एकत्र येणार असून एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

पालघर: केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वाढवण बंदराला ना हरकत दाखला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने ३१ जुलै रोजी दिला आहे. त्यातच हे वाढवण बंदर उभे राहिल्यास येथे तेलाची रिफायनरी येण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमार एकवटले असून या विरोधात एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ सप्टेंबर रोजी हजारोंच्या संख्येने मच्छीमार एकत्र येणार असून एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यातील मच्छिमार, शेतकरी, आदिवासी, बागायतीदार, डाय मेकर आदी भूमिपुत्र एकवटले असून वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने वाढवण येथे ३ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या एल्गार मोर्च्यात आक्रोश व्यक्त करण्यात येणार आहे. वाढवण बंदर विरोधी लढ्यात युवा संघर्ष समिती बरोबर संलग्न असणार्‍या अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, भूमिसेना आदिवासी एकता परिषद, लोकप्रहार सेना, सोसायटी फॉर फास्ट जस्टिस, समुद्र बचाव मंच (सातपाटी), सागर कन्या मंच (सातपाटी) आदी सर्व संघटनांनी एल्गार मोर्च्याला जाहीर पाठिंबा दिला असून या सर्व समित्या मोठ्या संख्येने बंदर विरोधी भूमिका घेण्यासाठी एकत्र येणार असल्याचे विरोधी संघर्ष समितीने म्हटले आहे.

- Advertisement -

वाढवण बंदर उभारून पालघर जिल्ह्याची संपूर्ण किनारपट्टी उध्वस्थ करण्याचे षडयंत्र राज्य आणि केंद्रातील दोन्ही सरकार करत असल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे देवेंद्र तांडेल यांनी केला आहे. वाढवण बंदर उभे राहिले तर पालघरमध्ये कच्च्या तेलाची रिफायनरी उभी राहून येथील पर्यावरण व जैवविविधता नष्ट होणार आहे. यामुळे पालघर तालुक्यातील किनारपट्टी लगतची गावे विस्थापित होणार असल्याची भीती तांडेल यांनी व्यक्त केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -