घरपालघरपुरातन मेघराज मंदिराला रस्त्याची प्रतिक्षा

पुरातन मेघराज मंदिराला रस्त्याची प्रतिक्षा

Subscribe

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडील मुख्य रहदारीच्या राष्ट्रीय महामार्गावरील जलसार-किरईपाडा गावाशेजारी असणाऱ्या सुमारे ५०० वर्षांपूर्वीच्या जुन्या मेघराज मंदिराला २०१२-१३ रोजी पर्यटन व तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला होता.

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडील मुख्य रहदारीच्या राष्ट्रीय महामार्गावरील जलसार-किरईपाडा गावाशेजारी असणाऱ्या सुमारे ५०० वर्षांपूर्वीच्या जुन्या मेघराज मंदिराला २०१२-१३ रोजी पर्यटन व तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यानंतर २०१५-१६ मध्ये या मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याला जिल्हा परिषदेकडू २९ लाख रुपयाचा निधी वनखात्याकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, फॉरेस्ट अधिकारी आणि संयुक्त कमिटीने जलसार ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता या नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने जलसार ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाला विरोध करून हे काम बंद केले असून सध्या रस्त्याचा निधी वनखात्याकडे धूळखात जमा पडला आहे.

सफाळे रेल्वे स्टेशनपासून राष्ट्रीय महामार्गाच्या ८ किलोमीटर अंतरावर जलसार-किरईपाडा गावातील डोंगरावर मेघराज नावाचे पाचशे ५०० वर्षांपूर्वीचे मंदिर असून हे मंदिर २ हजार ७५० फुट उंचावर आहे. हे मंदिर संपूर्ण दगडी व चुन्याचा वापर करून बांधण्यात आले आहे. या मंदिरातील मेघराज देव व इंद्रदेव अशा दोन मुर्त्या लाकडावर कोरल्या आहेत. तर मंदिराच्या बाजूला दोन दगडाच्यामध्ये खोलवर एक बोगदा असून या बोगद्यामध्ये बारमाही पिण्याचे पाणी असते. या डोंगरावर जाण्यासाठी विराथन बुद्रुक, टेंभीखोडावे, जलसार, किरईपाडा या मार्गाने जाण्यासाठी फक्त डोंगराल पायवाटा आहेत.

- Advertisement -

जलसार ग्रामपंचायत व ग्रामस्थाना विश्वासात न घेता जुन्या रस्त्याला जोडून नवीन रस्ता न घेता वनविभाग आणि संयुक्त कमिटीने रस्त्याचे काम हाती घेतले. यामुळे ग्रामपंचायत आणि गावकाऱ्यांनी या कामाला विरोध करून हे काम बंद पाडले आहे.
– गणेश भोईर, सरपंच, जलसार ग्रामपंचायत

हे मंदिर जागृत देवस्थान असल्यामुळे दरवर्षी जून महिन्यात पाऊस जोरदार पडावा म्हणून होम पूजा हवन केले जाते. याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक व माजी जिल्हा परिषद सभापती आणि जिल्हा नियोजन कमिटी सदस्य दामोदर पाटील आणि डहाणू डीव्हिजलन फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण कुमार यांच्या प्रयत्नाने २०१२-१३ रोजी मेघराज मंदिराला पर्यटन व तीर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला होता. त्याअनुषंगाने मंदिराकडे पर्यटकांना जाण्यासाठी नवीन रस्त्याला २०१५-१६ रोजी पालघर जिल्हा परिषदेकडून २९ लाखाचा निधी तत्कालीन सभापती दामोदर पाटील यांनी उपलब्ध करून तो वन खात्याकडे वर्ग केला होता.

- Advertisement -

निधी मिळाल्यानंतर किराईपाडा संयुक्त कमिटी आणि फॉरेस्ट खात्याने या मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरु केले होते. मात्र, जलसार ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांना विश्वासात न घेता जुन्या सोईस्कर रस्त्यापासून नवीन रस्ता न घेता नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्यामुळे जलसार ग्रामस्थांनी या नवीन रस्त्याला विरोध करून हे काम बंद पाडले होते. त्यावर अद्याप तोडगा न निघाल्याने रस्ताचे काम रखडून पडले आहे. तसेच या रस्त्याचा २९ लाखाचा निधी सध्या फॉरेस्ट खात्यात तिजोरीत धूळखात पडला आहे. तर दुसरीकडे भाविकांना व पर्यटकांना मात्र, या वादात दर्शनास व पर्यटनास मुकावे लागत आहे.

हेही वाचा –

मुंबईतील पूर स्थिती रोखण्यासाठी “विशेष प्रकल्प निधी”ची तरतूद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -