घरपालघरमीरा भाईंदरमध्ये पाणी पेटले; सत्ताधारी भाजपसह शिवसेना, मनसेचे आंदोलन

मीरा भाईंदरमध्ये पाणी पेटले; सत्ताधारी भाजपसह शिवसेना, मनसेचे आंदोलन

Subscribe

पुढील वर्षी मीरा भाईंदर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून भाजप, शिवसेना आणि मनसेने पाणी टंचाईवर राजकारण सुरु केले आहे.

पुढील वर्षी मीरा भाईंदर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून भाजप, शिवसेना आणि मनसेने पाणी टंचाईवर राजकारण सुरु केले आहे. तीनही पक्षांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरु केल्याने मीरा भाईंदरमध्ये पाणी पेटले आहे. मीरा-भाईंदर शहरात गेल्या १५ वर्षापासून पाण्याचे राजकारण सुरू आहे. शहराला वाढीव पाणी मिळेल की नाही, याचे कुणालाच सोयरसुतक नाही. फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी व राजकीय स्टंटबाजीसाठी सर्वच पक्ष पाण्यासाठी आंदोलन करत आहेत. शहरात आम्ही पाणी आणले म्हणून एक दोन वर्षांपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी मोठमोठे फलक लावले होते. आता पुन्हा हेच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत पाण्याचे राजकारण करत आहेत.

महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी होत आहेत. सत्ताधारी भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे यांनी पाणीटंचाईवर आंदोलनाला सुरुवात केली आहे. भाजप गेल्या साडेचार वर्षांपासून महापालिकेत सत्तेवर आहे. शिवसेना, काँग्रेस सध्या सत्तेवर आहे. मनसेने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले. त्यानंतर काँग्रेसनेही पाणी प्रश्नावर आंदोलन केले. सोमवारी शिवसेनेने घागर फोडो आंदोलन केले. आता भाजप २१ ऑक्टोबरला एमआयडीसीवर मोर्चा काढणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरच आंदोलनाला सुरुवात झाल्याने ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisement -

मीरा-भाईंदर शहरातील राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी शहरातील पाणी प्रश्नस कायमचा सोडवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मुळात राजकीय पक्षांची पाणी प्रश्न सोडवायची मानसिकता नाही. म्हणूनच आतापर्यंत शहरातील राजकारण हे पाण्यावर चालत आले आहे. १९९८ ला पाण्यासाठी मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतरही अद्यापही पाणी प्रश्न मार्गी लागलेला दिसून आलेला नाही.

विकासकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. पण, सत्ताधारी आणि प्रशासन या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना दिसत नाही. शहराला मिळत असलेल्या पाण्याची गळती थांबवणे, पाण्याची होत असलेली चोरी थांबवणे, नैसर्गिक पाण्याचे स्रोत निर्माण करणे, पाण्याच्या उपलब्धतेनुसार नवीन नळजोडणी देणे, पाणीसाठा वाढवण्यासाठी तलाव, विहिरी निर्माण करणे यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. पाण्यासाठी अवलंबून न राहता स्वतःचे पाणी स्रोत निर्माण करणे गरजेचे असताना त्यात उपाययोजना केल्या जात नाहीत. निवडणुकीच्या काळातच पाणीटंचाईचा बाऊ करून स्टंटबाजी केली जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

राहुल गांधींना अमली पदार्थांचे व्यसन, तस्करी करतात, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -