घरपालघरपालघर जिल्ह्यातील २४२ गावांचा पाणीप्रश्न सुटणार; ५४८ कोटींची निधी मंजूर

पालघर जिल्ह्यातील २४२ गावांचा पाणीप्रश्न सुटणार; ५४८ कोटींची निधी मंजूर

Subscribe

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५४८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५४८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आली आहे. यामुळे २४२ गावाचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असून त्यांना जल दिलासा मिळणार आहे. मोखाडा व इतर ग्रामीण भागात मार्च ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर सर्व गावांचा पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नातून सुटका होणार आहे. हिवाळ्यानंतर ग्रामीण भागात पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अशा भागांमध्ये पाण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षण अंतर्गत अनेक गावांसाठी प्रादेशिक योजनेची आखणी केली होती. त्यानुसार वेगवेगळ्या तालुक्यातील योजना कार्यान्वित करून प्रस्ताव पाठवण्यात आले. अखेर या प्रस्तावाच्या निधीला प्रादेशिक जीवन प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

विशेषतः मोखाड्या यासारख्या दुर्गम भागात महिलांना पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. त्यासाठी त्यांना मैलोन् मैल पायपीटसुद्धा करावी लागते. वरील योजना कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी उद्भवणारी पाणी टंचाईची परिस्थिती दूर होणार आहे. काही योजनांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. तसेच काही योजना या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेच्या मार्गावर आहेत. जिल्हा ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मोखाडा आणि ५८ गावे योजनेकरता १६६. ३८ कोटी, उंबरपाडा नंदाळे ३२ गावे पाणीपुरवठा योजनेकरता ८४.०९ कोटी, खानिवडे गारगाव २२ गाव पाणीपुरवठा योजनेकरता १६२ कोटी निधी मंजूर झाला आहे. ही तिनही कामे तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेकरता प्रलंबित आहेत. आबिटघर व १४ गावे पाणीपुरवठा योजना २५.७० कोटी व पडघेसह १९ गाव पाणीपुरवठा योजनेकरता ९.७९ कोटी इतका निधी मंजूर असून ही कामे ई-निविदा प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहेत. तसेच अर्नाळ्यासह ६९ गावे व केळवा माहीम १८ गावे पाणीपुरवठा योजनेकरता अनुक्रमे १६.९८ कोटी तसेच ६२.५४ इतका निधी मंजूर केला आहे. या कामांच्या प्रशासकीय मान्यता शासनाकडे अंतिम टप्प्यात असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

विरोधकांच्या बहिष्कारापेक्षा गाजली मुख्यमंत्र्यांची चहापानासाठीची गैरहजेरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -