घरपालघरसतरा गावांचा पाच दिवस पाणीपुरवठा बंद; विहिरीचा गाळ काढण्याचे काम सुरू

सतरा गावांचा पाच दिवस पाणीपुरवठा बंद; विहिरीचा गाळ काढण्याचे काम सुरू

Subscribe

पालघर तालुक्यातील केळवे रोड पूर्व भागात असलेल्या झांझरोळी धरणाअंतर्गत असणार्‍या १७ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचा गाळ काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आले आहे.

पालघर तालुक्यातील केळवे रोड पूर्व भागात असलेल्या झांझरोळी धरणाअंतर्गत असणार्‍या १७ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचा गाळ काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सतरा गावांचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार आहे. यापुर्वीही धरण दुरुस्तीच्या दरम्यान काही दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे. झांझरोळी धरणातून १७ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचा गाळ गेल्या अनेक वर्षापासून काढला नव्हता. त्यामुळे या विहिरीत सुमारे पंधरा ते वीस फूट गाळ जमा झाला असून विहिरीमध्ये जमलेला गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा गाळ सोमवार, ३० मेपर्यंत काढण्यात येणार असल्याने ऐन उन्हाळ्यात सतरा गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

गुरुवारी विद्युत बिल न भरल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने तुर्तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र वीज जोडणी सुरू केली असली तरी मुख्य विहीर साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
– प्रशांत इंगळे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग

- Advertisement -

मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पाण्याची भूजल पातळी खाली गेल्याने अनेकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही गावे-पाडे खाडी किनारी असल्याने बोअरवेल किंवा विहिरींना खारे पाणी लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी झाझंरोळी धरणावरच अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. गेले अनेक दिवस पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे सामाजिक संस्थेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. झाझंरोळी धरणाचे दोन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने १७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. झाझंरोळी धरणातून पश्चिमेकडील माहिम, केळवे, दातिवरे, माकुणसार, आगरवाडी, एडवण, विळंगी, कोरे, भादवे, मधुकर नगर आदी १७ गावांना आता पुन्हा पाणीपुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.

हेही वाचा –

नालेसफाईत दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला अवघा साडेतीन लाखांचा दंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -