घरपालघरमीरा -भाईंदरला बुधवारी पाणी पुरवठा होणार कमी दाबाने

मीरा -भाईंदरला बुधवारी पाणी पुरवठा होणार कमी दाबाने

Subscribe

पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे पाणी पुरवठा विभागाचे शरद नानेगांवकर यांनी आवाहन केले आहे.

भाईंदर । मीरा-भाईंदर शहरास होणारा स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होतो. त्यात स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा १८ ते १९ जानेवारी २४ तासासाठी बंद असणार आहे, त्यामुळे शहराला पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. मीरा-भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. स्टेम प्राधिकरणाकडून दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने मीरा-भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार १८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते गुरुवारे १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांकरिता बंद राहणार आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. तरी स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पूर्ववत होईपर्यंत मीरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे पाणी पुरवठा विभागाचे शरद नानेगांवकर यांनी आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -