घरपालघरजिल्हयात पुन्हा झेंडा फडकवू,आमदार सुनिल भुसारा यांचा दावा

जिल्हयात पुन्हा झेंडा फडकवू,आमदार सुनिल भुसारा यांचा दावा

Subscribe

यामुळे जिल्हयात पुन्हा आपला महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास आमदार सुनिल भुसारा यांनी यावेळी व्यक्त केला.

मोखाडा: आज भाजप आणि विरोधक धार्मिक मुद्दे पुढे आणून जातीच्या नावावर राजकारण करीत आहेत. अशावेळी पालघर जिल्हयात भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीची वज्र मूठ आपण बांधली असून या आधी सुध्दा आघाडीतून लढलेल्या सर्व विधानसभांवर महा विकास आघाडीचे आमदार निवडून आले होते. यावेळी तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत आहेत. यामुळे जिल्हयात पुन्हा आपला महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास आमदार सुनिल भुसारा यांनी यावेळी व्यक्त केला.

पालघर जिल्हयात प्रत्येक तालुकानिहाय सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून बैठका घेतल्या जात असून यावेळी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी,सीपीएम,काँग्रेस या पक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भुसारा यांनी विक्रमगड विधानसभामधील मतांच्या गणिताची मांडणी करून भाजप सरकार हे आदिवासींच्या विरोधातील सरकार असून आरक्षण नष्ट करणे, शेतकर्‍यांच्या पिकांना चांगला भाव न देणे तसेच भाजपचे नेते धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू करण्याची मागणी करीत आहेत,असे म्हटले. यामुळे जात, धर्म, पक्ष, पंथ, वर्ण यांच्या पलीकडे जावून आपण एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विकास मोरे, सह संपर्क प्रमुख निलेश गंधे, मधुकर चौधरी,अशोक पाटील, प्रमोद कोठेकर,जमाशीद शेख यांची भाषणे झाली. एकाच दिवशी जव्हार आणि मोखाडा या दोन्ही तालुक्यांत या आढावा बैठकी घेण्यात आल्या. या आढावा बैठकीत मोखाडा तालुक्यातील तरुणांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. हे सर्व तरुण शिवसेना शिंदे गटाशी संबंधित होते. मोखाडा नगरपंचायत क्षेत्रातील गणेश सापटा, शोएब पिंजारी यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ५० हून अधिक तरुणांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -