घरपालघरबुधवारचा दिवस संपकऱ्यांनी गाजवला

बुधवारचा दिवस संपकऱ्यांनी गाजवला

Subscribe

परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांनंतर संध्याकाळी 6 वाजता जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

पालघर: खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील वीज कर्मचार्‍यांनी तीन दिवस संप पुकारला होता. यामध्ये राज्यातील विविध वीज कर्मचार्‍यांची ३२ संघटना सामील झाल्या होत्या. त्याअनुषंगाने महावितरणच्या पालघर विभागातील ही सुमारे ८०० वीज कर्मचार्‍यांनी संपामध्ये सहभाग घेतला होता. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांनंतर संध्याकाळी 6 वाजता जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी संपावर गेले होते. वीज महावितरणच्या खासगीकरणाविरोधात वसई तालुक्यातील महावितरणाचे अधिकारी, कर्मचारी एकवटले.वसईत तीव्र आंदोलन सुरू केले होते. अदानी गो बॅक, खासगीकरण थांबलेच पाहिजे, जनतेचे महावितरण वाचले पाहिजे अशा घोषणा देत वसई महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर बुधवारी ११ वाजल्यापासून आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात तालुक्यातील १ हजार २०० च्या वर महावितरण अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरणने संपाची हाक दिली होती. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचार्‍यांच्या जवळपास ३२ संघटनांनी हा संप पुकारला होता. ४,५ व ६ जानेवारी २०२३ असा तीन दिवस हा संप असणार होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -