Eco friendly bappa Competition
घर पालघर नालासोपार्‍यात कोट्यवधींचे रूग्णालय बांधलयं कशाला ?

नालासोपार्‍यात कोट्यवधींचे रूग्णालय बांधलयं कशाला ?

Subscribe

रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्यानेही त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन रुग्णांनाच त्रास होताना दिसत आहे.

वसई : कोट्यवधी रुपये खर्च करून वसई -विरार महापालिकेने नालासोपार्‍यात रुग्णालय बांधले आहे. मात्र, त्याठिकाणी रुग्णांना कोणतीच सोय नसल्याने विविध तपासण्या करण्यासाठी खाजगी तपासणी सेंटरकडे पाठवले जात आहे. रुग्णांची गैरसोय सुरु असल्याने आरोग्य सेवाच वार्‍यावर असल्याची तक्रार काँग्रेसच्या समेळ गाव अध्यक्षा रुचिता नाईक यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली आहे.नालासोपारा पश्चिमेला वसई -विरार महापालिकेचे एकमेव रूग्णालय आहे. करोडो रूपये खर्च करून सुसज्ज रूग्णालय महापालिकेने बांधले आहे. मात्र, त्याठिकाणी कोणतीही सुविधा नसल्याने रूग्णालय हे रूग्णांसाठी शोभेची बाहुली ठरली आहे. रूग्णालयात एमआरआय, सिटी स्कॅन, ईको तपासणी करण्याची सोय नसल्याने रूग्णांना खासगी तपासणी सेंटरमध्ये पाठवून महापालिकेत कार्यरत काही डॉक्टर टक्केवारी घेण्याचे काम करत आहेत. त्यामुळे रुग्णांची लुटमार होत असल्याची तक्रारही रुचिता नाईक यांनी केली आहे.रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्यानेही त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन रुग्णांनाच त्रास होताना दिसत आहे.

सुरक्षा रक्षकांकडून अरेरावीची भाषा
रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडून रूग्णांचा नातेवाईकांना अरेरावीची भाषा करुन अपमानास्पद वागणूक दिली जाते, याकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. रूग्णांना भेडसावणार्‍या समस्यांवर उपाययोजना करून तातडीने एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशिन सुरू कराव्यात. तातडीने रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी त्यांची मागणी आहे. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याचे नाईक यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -