घर पालघर बंद झालंय वाय-फाय कंटाळवाण्या प्रवासात करायचं काय ?

बंद झालंय वाय-फाय कंटाळवाण्या प्रवासात करायचं काय ?

Subscribe

त्यामुळे एस. टी. चा प्रवास सुखद वाटू लागला होता. परंतु सन २०१७ मध्ये एका कंपनीसोबत वायफायचा केलेला पाच वर्षांचा करार संपल्याने मोफत वायफायचा सुविधा बंद असल्याची माहिती जव्हार आगाराचे आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी दिली आहे.

जव्हार: एस.टी. बसच्या प्रवासात मनोरंजन व्हावे म्हणून प्रवाशांच्या सेवेसाठी सन २०१७ मध्ये प्रत्येक बसमध्ये मोफत वायफाय देण्याची सुविधा निर्माण करण्यात आली होती.यात जव्हार आगारातील ५६ बसेस देखील समाविष्ट होत्या. परंतु, करार संपल्याने पाच वर्षांतच ही सेवा बंद पडल्याने मोफत वायफायचा गाशा गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या प्रवासात करमणुकीचा खोळंबा होत आहे. राज्यातील अठरा हजार बसमध्ये मोफत वायफाय लावण्यात आले होते. यासाठी दरवर्षी अतिरिक्त एक कोटीचा भार महामंडळाने घेतला. वायफाय लावल्याने एस.टी. बसने करणार्‍यांची संख्या वाढली. प्रवासामध्ये वायफाय कनेक्ट केल्यानंतर प्रवाशांचे मोफत मनोरंजन होऊ लागले. त्यामुळे एस. टी. चा प्रवास सुखद वाटू लागला होता. परंतु सन २०१७ मध्ये एका कंपनीसोबत वायफायचा केलेला पाच वर्षांचा करार संपल्याने मोफत वायफायचा सुविधा बंद असल्याची माहिती जव्हार आगाराचे आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी दिली आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली वाय-फाय सेवा काही दिवसापासून बंद असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत. एसटी प्रवाशांची संख्या वाढावी, प्रवाशांचा प्रवास रंजक व्हावा यासाठी महामंडळाने यंत्र मीडिया सोल्यूशन या खासगी कंपनीच्या माध्यमातून वाय-फाय सुविधा सुरू केली होती. त्यानंतर ’एसटीचा प्रवास; मनोरंजन हमखास, अशी प्रवास जाहिरातबाजीही महामंडळाने केली. मात्र अनेक गाड्यांमधील वाय-फाय बंद पडल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

 

प्रवाशांना अनेक सवलती एस. टी. महामंडळ देते. परंतु, प्रवासात मिळत असलेले मनोरंजन वायफाय करार संपल्याने हिरावले गेले आहे. त्यामुळे मोफत वायफाय सेवा उपभोगणार्‍या प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.ही सुविधा पुन्हा कार्यान्वित व्हावी.
सचिन शिंगडा, उपाध्यक्ष, काँग्रेस, पालघर जिल्हा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -