घरपालघरप्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलांकरता पाठपुरावा करणार - पालकमंत्री दादा भुसे

प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलांकरता पाठपुरावा करणार – पालकमंत्री दादा भुसे

Subscribe

वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडी सुटावी, याकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नव्याने रेल्वे उड्डाणपूल विकसित करण्याकरता महापालिकेने मान्यता दिली आहे.

वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडी सुटावी, याकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नव्याने रेल्वे उड्डाणपूल विकसित करण्याकरता महापालिकेने मान्यता दिली आहे. महापालिकेकडून हा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला सादर करण्यात आला आहे. या कामाकरता मोठा निधी लागणार असल्याने ही कामे अद्याप प्रस्तावित आहेत. मात्र वसई-विरारकरांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी. यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रशासकीय स्तरावर या कामांकरता पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

शहराची वाढती लोकसंख्या व वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेता विरार येथील विराट नगर येथे नव्याने रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या कामाबाबत संबंधित विभागास निर्देश द्यावेत, अशी विनंती महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पालकमंत्र्यांना केली आहे.
या उड्डाणपुलाचा संदर्भ देताना पालकमंत्री दादा भुसे यांनी विरार, नालासोपारा, वसई रोड व नायगाव या चार ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलांच्या कामाकरता आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्राची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२.२३ लाख व सध्याची अंदाजे २४ लाख इतकी आहे. मुंबई महानगरालगत येत असल्याने वसई-विरारचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात पश्चिम रेल्वेची विरार, नालासोपारा, वसई रोड व नायगाव ही चार रेल्वे स्थानके येतात. पूर्व-पश्चिमेस जोडणाऱ्या अस्तित्वातील रेल्वे उड्डाणपुलांची संख्या खूपच कमी असल्याने या पुलांवर वाहतुकीचा ताण येतो. ही समस्या लक्षात घेता महापालिकेच्या प्रस्तावित रिंग रुटला जोडणारा विराट नगर येथील प्रमुख उड्डाणपूल झाल्यास विरार शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, वसई-विरार शहरातील विकासकामांच्या आढाव्याकरता पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान, आयुक्तांनी विरार येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या मागणीचे पत्र पालकमंत्र्यांना सुपूर्द केले. विशेष म्हणजे विधान परिषद आमदार व शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांनीही या आधी या मागणीचे पत्र महापालिका आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

राज ठाकरेंच्या गाडीलाही भाजपची भुरळ? भाजप कार्यालयासमोर दिसली गाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -