दुर्गम भागात स्वस्त धान्यसाठा सुरक्षित करण्याचे काम सुरू

वाडा तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ, अतिदुर्गममध्ये येतो. मान्सून सुरु होण्यापूर्वी येणार्‍या वादळवार्‍यात घरांची होणारी पडझड, वीज कोसळण्याचे प्रकार घडतात.

वाडा तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ, अतिदुर्गममध्ये येतो. मान्सून सुरु होण्यापूर्वी येणार्‍या वादळवार्‍यात घरांची होणारी पडझड, वीज कोसळण्याचे प्रकार घडतात. या नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी या कालावधीत शक्यतो घराबाहेर न पडण्याचे तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये, घरांमध्ये राहू नये, असे आवाहन वाड्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी केले आहे. तसेच पावसाळ्यात दुर्गम भागातील अनेक गांव, पाड्यांचा संपर्क तुटत असल्याने या भागासाठी स्वस्त धान्य (रेशनिंग) साठा करण्याचे काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील सर्वच खाते प्रमुखांना मान्सून पुर्व संभाव्य नैसर्गिक धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी करावे लागणारे उपाययोजना बाबत सुचना केल्या आहेत.
– डॉ. उद्धव कदम, तहसिलदार, वाडा तालुका

मान्सून सुरु होण्याआधी या भागात नेहमीच वादळवार्‍यांमुळे मोठे नुकसान होते. वीज अंगावर कोसळून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. या घटना टाळण्यासाठी तालुक्यातील सार्वच विभागाच्या खाते प्रमुखांना सुचना केल्या आहेत. वाडा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आखाडा, ओगदा, वरसाळे, निंबवली या ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक पाड्यांमध्ये पावसाळ्यातील चार महिने वाहने जात नसल्याने या गांव, पाड्यांतील रेशनिंग लाभार्थ्यांना पुरेसा धान्य साठा करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली.

हेही वाचा –

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट