घरपालघरग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Subscribe

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने ३०० कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामिण भागात कामकाज ठप्प झाले आहे.

पालघर: पालघरमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर मंगळवारी २६ फेब्रुवारीपासून काम बंद करत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्याकरिता राज्यभर २६ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून पालघर जिल्हा परिषद येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने ३०० कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामिण भागात कामकाज ठप्प झाले आहे.

राज्यातील २७९२० ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीज पुरवठा कामगार, कर वसुली कर्मचारी, लिपिक इत्यादी पदावर काम करीत असलेले जवळपास ६० हजार कामगार अत्यल्प वेतनात काम करीत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असून या अगोदर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन, मेळावे, मोर्चे व अधिवेशन करण्यात आले होते. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आश्वासन दिले होते. मात्र प्रशासकीय बैठकीत अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी निर्णय न झाल्यामुळे २६ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून जिल्हा परिषद कार्यालय येथे आंदोलन सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी, निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे, वेतन अनुदानासाठी लादलेली वसुलीची अट पूर्णतः रद्द करण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील १० ऑगस्ट २०२० पासून मार्च २०२२ पर्यंत थकीत असलेली फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष यांना आंदोलनादरम्यान देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -