Eco friendly bappa Competition
घर पालघर तुमची आरोग्य कुंडली आता क्यू आर कोडमध्ये

तुमची आरोग्य कुंडली आता क्यू आर कोडमध्ये

Subscribe

लॉकेटमधील क्यूआर कोड स्कॅन करून त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि आजारांचे निराकरण विनाविलंब करणे शक्य होणार आहे. केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प या सामाजिक संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे.

wबोईसर । डिजीटल पेमेंटसह शालेय शिक्षणातही महत्वाची भूमिका बजावणारी क्यूआर कोड प्रणाली आता सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही यशस्वी होत आहे.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३१ गाव-पाड्यातील आदीवासींच्या आरोग्याची सर्व माहिती स्वास्थ लॉकेटच्या माध्यमातून या नागरिकांसोबत कायम राहणार असून लॉकेटमधील क्यूआर कोड स्कॅन करून त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि आजारांचे निराकरण विनाविलंब करणे शक्य होणार आहे. केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प या सामाजिक संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे.

सार्वजनिक आरोग्यासाठी क्यूआर कोड प्रणाली सध्या देशात प्रथमच वापरली जात आहे. पालघर जिल्ह्यातील ३१ गावे आणि पाड्यांवर हा प्रयोग सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असून लवकरच ११ हजार नागरिकांच्या आरोग्यहितासाठी हा प्रकल्प प्रत्यक्षात येणार असल्याचे ग्रामविकास प्रकल्पाचे विमल केडीया आणि संतोष गायकवाड यांनी सांगितले.राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे माजी सहाय्यक संचालक डॉ.सुरेश सरवडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे.आदीवासी गावे आणि पाडे येथील दाम्पत्यांना प्रशिक्षण देऊन त्या-त्या गावातील नागरिकांना जाणवणार्‍या आरोग्यविषयक तक्रारी,आजारांची आगाऊ माहिती घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन व तपासणी करून एकत्र करण्यात येत आहे.त्यातून परिवार स्वास्थ कार्डच्या माध्यमातून त्याची नोंद करण्यात येते.विविध श्रद्धा-अंधश्रद्धा आणि समजुतीमुळे या भागातील नागरिक एखादा ताईत किंवा लॉकेट परिधान करतात.याच लॉकेटमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून ही एकत्र केलेली माहिती उपलब्ध झाली तर कोणत्याही अडचणीच्या काळात या नागरिकांची मेडीकल हिस्ट्री काय आहे हे सहज समजू शकणार आहे.

- Advertisement -

ही सर्व माहिती दर सहा महिन्यांनीअपडेट केली जाणार आहे. असा होणार फायदास्वास्थ लॉकेटमुळे गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य स्थिती त्वरीत समजण्यास मदत होणार आहे.व्यक्तिला असलेल्या आजाराचा पूर्व इतिहास समजण्यास मदत होईल. सोबत आरोग्य अहवाल घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, हिमोग्लोबिन, वजन, ऊंची, रक्तगट तसेच व्यक्तीचे नाव, गाव यांच्यासह वैयक्तिक माहिती या लॉकेटमध्ये असणार आहे. अचानक झालेला अपघात, लहान मुले किंवा व्यक्ती हरवणे अशा परिस्थितीत पोलिसांना सहज घरचा पत्ता मिळू शकतो

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -