घरसंसदीय अधिवेशन 2022इस्रोने पाच वर्षांत 177 विदेशी उपग्रह केले प्रक्षेपित; 94 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची...

इस्रोने पाच वर्षांत 177 विदेशी उपग्रह केले प्रक्षेपित; 94 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कमाई

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळ संशोधनात वेगळा ठसा उमटवला आहे. आता इस्रोच्या व्यावसायिक शाखेने देखील भरीव कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांत 177 विदेशी उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केले आहेत. त्याद्वारे इस्रोने 94 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 46 दशलक्ष युरोचे परदेशी चलन मिळवले आहे.
इस्रोने आपल्या व्यावसायिक शाखेद्वारे गेल्या पाच वर्षांत 19 देशांचे 177 परदेशी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत अशी माहिती, केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत इस्रोने ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, फ्रान्स, इस्रायल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, इंग्लड आणि अमेरिका या देशांचे 177 परदेशी उपग्रह पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही-एमकेआयआयआय प्रक्षेपकांनी व्यावसायिक करारांतर्गत यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत. या 177 परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून सुमारे 94 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 46 दशलक्ष युरोचे परदेशी चलन प्राप्त झाल्याची माहितीही डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा – केवळ संधीसाधूपणा, स्वत:ला मनमोहन सिंग समजतात; आरबीआयच्या माजी गव्हर्नरांवर भाजपची टीका

याशिवाय, अवकाश उपक्रमांबाबत बिगर-सरकारी संस्थाना प्रोत्साहन देण्याकरता तसेच त्यांच्या हाताळणीसाठी इन-स्पेस ही एक खिडकी व्यवस्था उभारल्याने याबाबत स्टार्टअप्स क्षेत्रात लक्षणीय रस दिसला. परिणामी, इन-स्पेस डिजिटल मंचावर आतापर्यंत 111 अवकाश स्टार्टअप्सची नोंदणी झाली असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

- Advertisement -

गेल्या 23 ऑक्टोबरला इस्रोच्या सर्वात वजनदार रॉकेट LVM3-M2ने ब्रिटिश कंपनी वनवेबचे 36 ब्रॉडबँड उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले होते. फेब्रुवारी 2023पर्यंत पुढील LVM-3 तयार होईल, त्यावेळी वनवेबसाठी उपग्रह लॉन्च करण्याची आणखी एक योजना आखण्यात येत असल्याचे इस्रोने त्यावेळी म्हटले होते. इंडियन स्पेस असोसिएशन (ISPA) आणि अर्नस्ट अॅण्ड यंग यांच्या अलीकडील अहवालानुसार जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था 447 अब्ज डॉलर्सची आहे. त्यात उपग्रह प्रक्षेपण व्यवसाय 6 अब्ज डॉलर्सचा आहे. यातील मोठा हिस्सा मिळविण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -