Union budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या रंगाशी मिळत्या-जुळत्या साड्या

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय बजेट सादर करत आहेत. यासाठी त्या संसदेत पोहोचल्या असून आज सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्पीय भाषण करायला सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या साडीची विशेष चर्चा रंगतेय, त्यांनी आज परिधान केलेल्या लाल साडीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. निर्मला सीतारामन यांनी पारंपरिक टेंपल बॉर्डर असलेली भडक लाल रंगाची साडी नेसली आहे. या साडीला काळ्या रंगाची बॉर्डर आहे.निर्मला सीतारामन यांना पारंपारिक, क्लासी हँडलूम आणि सिल्क साड्यांची खूप आवड आहे. त्या नेहमीच विविध रंगाच्या साड्या परिधान करतात. शिवाय अनेकदा त्यांच्या साड्या 10 ते 2000 रुपयांच्या नोटांच्या रंगाशी मिळत्या-जुळत्या असतात.