100 crore vaccination: तिरंग्याच्या रोषणाईत झगमगली देशातील ऐतिहासिक स्थळे

100 crore vaccination Historic places of country glow in Tri-color to celebrate the landmark achievement
100 crore vaccination: लसीकरणाच्या आनंदात तिरंग्याच्या रोषणाईत झगमगली देशातील ऐतिहासिक स्थळे

गुरुवारी देशात १०० कोटींची लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला. संपूर्ण देशासाठी ही फार महत्त्वाची बातमी होती. याच निमित्ताने देशातील शंभर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांना तिरंग्याच्या रंगातील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नारंगी, सफेद आणि हिरव्या रंगात देशातील ऐतिहासिक स्थळे उजळून निघाली आहेत. भारत हा जगभरात सर्वात जलद लसीकरण करणारा देश ठरला आहे. लसीकरण मोहीमेत भारत नेहमीच अग्रेसर होता. कोरोना महामारीत लढण्यासाठी देशाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे होऊ शकले. देशातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशातील ऐतिहासिक स्थळांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आलेल्या देशातील शंभर ऐतिहासिक स्थळांमध्ये यूनेस्कोच्या जागतिक वारसा लाभलेल्या स्थळांचा देखील समावेश आहे. पहा देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर देशातील ऐतिहासिक स्थळांना करणारी आलेली आकर्षक विद्युत रोषणाईचे काही खास फोटो ( फोटो : सोशल मीडिया )