भारतात ऑडी इंडियाची दमदार ‘Audi Q5’ लाँच

2021 audi q5 facelift india launch today check expected price and other details
भारतात ऑडी इंडियाची पॉवरफुल 'Audi Q5' लाँच

ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज आपल्या ऑडी क्यू५च्या भारतातील लाँचिंगची घोषणा केली. ऑडी क्यू५ मध्ये स्पोर्टी वैशिष्ट्ये आणि दैनंदिन वापराची योग्यता यांचा मिलाफ साधण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये इन्फोटेनमेंट आणि असिस्टन्सचेही अनेक पर्याय आहेत. ऑडी क्यू५ नेहमीच तिचे आकारमान, कामगिरी व उपकरणे यांच्या अचूक मिलाफासाठी प्रसिद्ध राहिली आहे. या अत्यंत यशस्वी मॉडेलच्या बाह्यरचनेला एक धारदार स्वरूप दिल्यामुळे क्यूची ओळख अधोरेखित झाली आहे आणि क्वात्रोची अंगभूत वैशिष्ट्ये त्यात सामावली गेली आहेत.

ऑडी क्यू५ मध्ये, २४९ हॉर्सपॉवर ऊर्जा व ३७० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या २.० लिटर टीएफएसआय इंजिनची शक्ती आहे. औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात तयार झालेली ऑडी क्यू५ प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असून यांची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे ५८,९३,००० रुपये आणि ६३,७७,०००रुपये आहे.