26/11 Mumbai Attack: महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने गेटवे येथे शहीदांना श्रद्धांजली

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शहीदांना श्रद्धांजली

मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी संपूर्ण मुंबई हादरली होती. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांकडे कोणतेही अत्याधुनिक शस्त्रास्त्र नसतानासुद्धा मोठ्या हिमतीने दहशतवादाचा सामना करून देशाचे आणि राज्याचे रक्षण केले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये शहीद जवानांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली कार्यक्रम व मशाल रॅलीचे आयोजन करत आलेली आहे.यासाठीच आज शहीदांना श्रध्दांजली देण्याकरीता २६ नोव्हेंबरला जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत गेटवे येथे शहींदासाठी श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.(छाया: दिपक साळवी)


हे ही वाचा – 26/11 Mumbai Attack: मुंबई दहशतवादी हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण; वाचा संपूर्ण थरारक घटना