26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना राज्यपाल, राजकीय नेत्यांची श्रद्धांजली

26 11 mumbai Terror attack
26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना राज्यपाल, राजकीय नेत्यांची श्रद्धांजली

26 नोव्हेंबर 2008 हा दिवस संपूर्ण मुंबईकरांसाठी काळजाचा थरकाप उडवणारा ठरला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य नाही तर देश हादरून गेला होता. पाकिस्तानच्या जौश ए मोहम्मद या दहशतवाद्यांनी मुंबईत दहशतवादी हल्ला केला . या हल्ल्यामध्ये अनेक नागरीकांना वाचवण्यासाठी अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मुंबईत घडलेल्या या दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहे. आजही त्या भयावह आठवणी अनेकांच्या लक्षात आहेत. या निमित्ताने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थितीत होते.