ऋषी कपूर अनंतात विलीन

बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल (२९ एप्रिल) जगाला अलविदा केल्यानंतर आज (३० एप्रिल) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील मरीन लाईन्स इथल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

rishi kapoor