Apurva Nemlekar: अपूर्वाचं साडीतलं निखळ सौंदर्य, पहा फोटो

Actress Apurva Nemlekar New Saari Photoshoot
Apurva Nemlekar: अपूर्वाचं साडीतलं निखळ सौंदर्य, पहा फोटो

रात्रीस खेळ चाले मधील शेवंता म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिका सोडली असली तरीही अपूर्वा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत जोडली गेली आहे. अपूर्वा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसी संवाद साधत असते. अपूर्वाने नुकतचं तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. अपूर्वा एक अभिनेत्री बरोबरच एक ज्वेलरी डिझायनर देखील आहे. अपूर्वा कलेक्शन नावाचा तिचा ब्रँड आहे. तिने डिझाइन केलेली ज्वेलरी घालून अपूर्वाने फोटोशूट केलं आहे. अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे सौंदर्य फार खुलून आले आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झालेत. पहा अपूर्वाचे काही खास फोटो ( फोटो – अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम हँडलवरुन साभार )