Photo : अभिनेत्री वनिता खरातच्या हातावर रंगली मेहंदी

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मागील काही दिवसांपूर्वी वनिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेमाची कबूली दिली होती. दरम्यान, आता लवकरच वनिता बोहोल्यावर चढणार आहे. नुकतंच वनिताच्या मेहंदीचे फोटो तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.