कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 (Cannes Film Festival 2022) पासून अनेक बी-टाउनमधील अभिनेत्रींचे अतिशय ग्लॅमरस आणि हटके लूक समोर येत आहेत. यात दीपिका पदुकोणपासून (deepika padukon) ते ऐश्वर्या राय (aishwarya rai) बच्चनपर्यंत सगळ्यांनीच त्यांच्या जबरदस्त लुकने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचवेळी अभिनेत्री आदिती राव हैदरीचे (Aditi Rao Hydari) या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये तिने भारतीय पद्धतीनुसार पारंपारिक साडी नेसलेली दिसतेय. आदिती राव हैदरी ही ब्युटी सोशल मीडियापासून दूर असली तरी तिला पार्टी किंवा इव्हेंटमध्ये स्पॉट केले जाते. यातील तिचे सौंदर्यपासून सगळेच भारावून जातात. कान्समधील असेच काहीसे तिचे फोटो आता पाहायला मिळत आहे, यात तिच्या सिंपल लूकने सर्वांची मनं जिंकली आहेत.(hydari sabyasachi saree)