अहमदाबाद : गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविधरंगी फुले, त्यांचे वेगवेगळे आकार यामुळे पाहणाऱ्याचे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहात नाही.
या प्रदर्शनात ठेवण्यात आलेले प्राणी, पक्षी तसेच काही महत्त्वाच्या इमारती या फुलांनीच तयार करण्यात आल्या आहेत.
फुलांपासून बनवलेले प्राणी, कीर्ती स्तंभ, ऑलिम्पिक मशाल तसेच गरबा खेळणाऱ्या मुली देखील यात दाखवण्यात आल्या आहेत.
हे प्रदर्शन सहा भागात विभागण्यात आले आहे. यात फुलांच्या 50 प्रजातींच्या 10 लाखांहून अधिक फुलांच्या सहाय्याने तसेच मातीच्या 30 हून अधिक मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 22 जानेवारीपर्यंत सुरू असेल.
छोटा भीम, डोरेमॉन सारखे कार्टून्स देखील आहेत, जे मुलांसाठी तयार करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, येथे गांधीजींच्या तीन बहुचर्चित माकडांचा देखील समावेश आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे ठेवण्यात आलेल्या प्रत्येक आकृतीच्या बाजूला एक QR Code आहे. तो प्रेक्षकांनी स्कॅन केल्यास त्यांना त्या आकृतीची संपूर्ण माहिती मिळेल.