अजित पवारांनी घेतलं परळी वैजनाथाचे दर्शन

प्रभू श्री वैद्यनाथांचे विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना आम्ही सर्वांनी केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी अजित पवार करत आहेत. यादरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यातील परळीयेथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैजनाथ मंदिराला भेट दिली. शिवलिंग श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा अभिषेक आणि पूजा करुन राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना सुखकर करण्याची प्रार्थना अजित पवार यांनी केली आहे.