आलियाच्या मॅटर्निटी लूकची सोशल मीडियावर चर्चा

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच आई होणार आहे. आलिया जरी आई होणार असली तरी ती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव असते. तर दुसरीकडे आलिया तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्येही तितकीच व्यस्त आहे. सध्या आलिया तिचे मॅटर्निटी लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. आलियाचे हे मॅटर्निटी लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत असतात.