1 of 8

सात जिल्ह्यांना जोडणारा २९६ किमी बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा एक्स्प्रेस वे विक्रमी वेळेत बांधण्यात आला असून अंदाजे खर्चापेक्षा कमी खर्च करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. २० फेब्रुवारी २०२० मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली. कोरोना काळत हा प्रकल्प सुरू झाला असला तरीही वेळेआधी म्हणजेच २८ महिन्यांत पूर्ण करण्यात आला.

बुंदेलखंड द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठी १४ हजार ८५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा खर्च अपेक्षित खर्चापेक्षा १२.७२ टक्के कमी होता. राजधानी दिल्लीत जाण्यासाठी हा सोयीचा मार्ग असून यामुळे औद्योगिक प्रगतीही होणार आहे.

या एक्स्प्रेस वेवर चार रेल्वे ओव्हर ब्रिज असून १४ मोठे पूल बांधण्यात आले आहेत. तर २६६ छोटे पूल बांधले आहेत. १८ फ्लायओव्हर असून १३ टोल प्लाझा आणि ७ रॅम्ब प्लाझाही आहेत.

हा बुंदेलखंड एक्स्प्रेस वे सात जिल्ह्यांना लागून आहे. चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरेया आणि इटावा जिल्हे या वेमुळे जोडले जाणार आहेत. तसंच, चित्रकूट ते दिल्ली हा ६३० किमीचा प्रवास ७ तासांत पूर्ण होऊ शकणार आहे.