Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी PHOTO : 'महाराष्ट्र भूषण' आशा भोसले

PHOTO : ‘महाराष्ट्र भूषण’ आशा भोसले

Subscribe

मुंबईः ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने शुक्रवारी गौरवण्यात आले. भव्य अशा कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन गायिका आशा भोसले यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याची काही क्षणचित्रे…

- Advertisement -

या कार्यक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हजर होता. त्याच्या उपस्थितीत गायिका आशा भोसले यांना सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मंचावर होते.

- Advertisement -

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत गायिका आशा भोसले यांना सन्मान चिन्ह देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराच्या रक्कमेचा धनादेश गायिका आशा भोसले यांना देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर उपस्थित होते.

- Advertisment -