नितीन देशमुखांचे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण; आदित्य ठाकरेंपासून गिरीश महाजन, नाना पटोलेंनी घेतली भेट

मुंबईः २९ जिल्ह्यातील पाणी योजना स्थगित केल्याने आमदार नितीन देशमुख यांनी मंगळवारी विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. सर्वसाधारणपणे विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याची परंपरा आहे. त्यामुळेच नितीन देखमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मंत्री शंभुराज देसाई यांनी केली. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 

नितीन देशमुख यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सुनील प्रभू, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व अन्य आमदार आंदोलनस्थळी गेले होते.

आमदार आदित्य ठाकरे, आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व अन्य आमदारांनाही नितीन देशमुख यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

विरोधकांसह सत्ताधारीदेखील नितीन देखमुख यांचे आंदोलन समजून घेण्यासाठी आंदोलनस्थळी गेले होत. मंत्री गिरीष महाजन, तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले , आमदार रविंद्र वायकर यांनी नितीन देशमुख यांची भेट घेतली.