पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज (ता. 31 मे) मोठ्या उत्साहात राज्यभरात साजरी करण्यात आली. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेल्या चौंडी येथे मात्र अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलेली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जनतेशी संवाद साधला. तर अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेल्या चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलेली होती.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौंडीतील मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले.
यानंतर अहिल्यादेवी होळर याच्या पुतळ्याची पाहणी केली. तसेच मान्यवरांनी परिसरात उभारण्यात आलेल्या शिल्पवृष्टीची पाहणीही केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घोंगडी आणि अहिल्यादेवी होळकरांचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे,खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकताई राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद पडळकर,अण्णासाहेब डांगे, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार भीमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपरस्थित राहिलेल्या जनतेचे सर्व मान्यवरांनी हात जोडून आभार मानले