शिवसेनाप्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देते आज अनेक राजकीय नेते मंडळांनी सोशल मिडीयाच्या माध्यामातून श्रध्दांजली दिली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्ट मध्ये अदित्य ठाकरे यांनी “आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो… त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही! मी भाग्यवान आहे की, जगासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असलेला युगपुरूष माझा ‘आज्या’ आहे… बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन! अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे.
साहेब, आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह दादर येथील स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांची एक आठवण शेअर केली आहे. धमकी आली होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी आपल्यावर कसा विश्वास टाकला होता, हे नारायण राणेंनी सांगितलं. शिवाय बाळासाहेबांच्या सुरक्षेची आपण कशी काळजी घेतली हा संपूर्ण किस्सा नारायण राणे यांनी शेअर केला आहे. राणे यांनी त्यांच्या झंझावात या आत्मचरित्रातील एक किस्सा शेअर केलाक आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यस्मरण केले. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, राजकीय भाष्यकार, अमोघ वक्ता यासारख्या विविध क्षेत्रात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. जनमानसांमध्ये मराठी अस्मिता जागवणारे, मराठी माणसांच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेणारे, तत्वांचे मोल जाणणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतीदिन आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, असं सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.