विधानसभेत जाण्यापूर्वी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची भगव्या फेट्यात दमदार एन्ट्री

Before going to the assembly, BJP and Shinde MLAs made strong entry in saffron headdress

आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या कामकाजाला सभागृहात सुरुवात झाली होती. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस या नव्या सरकारची आज विधानसभेत पहिली परीक्षा पार पडली. अध्यक्षपदासाठी शिवसेना आमदार राजन साळवी आणि भाजप आमदार राहुल नार्वेकर अध्यक्ष पदासाठी यांच्यात लढत होती. यावेळी १६४ आमदारांच्या पाठिंब्यासह राहुल नार्वेकर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.विधानसभेत हजर होण्यापूर्वी शिंदे गटाने कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच आमदारांनी विधानसभा भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. यावेळी भाजप आणि शिंदे गटातील सर्व आमदारांनी भगवा फेटा परिधान केला होता.