घरफोटोगॅलरीPhoto : मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ‘दी मॅजेस्टिक’ आमदार निवासाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन

Photo : मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ‘दी मॅजेस्टिक’ आमदार निवासाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन

Subscribe

‘दी मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृहाच्या तसेच आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तूच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

- Advertisement -

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. राजेंद्र भागवत आदींसह विधानमंडळ तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

या वास्तूचे अत्याधुनिकरण आणि सुशोभिकरण येत्या 18 महिन्यांत पूर्ण करणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.

फोर्टमधील ‘दी मॅजेस्टिक’ वास्तू ही ग्रेड 2 ए हेरिटेज इमारत असून ती वास्तव्यास धोकादायक झाली आहे. तिचे संवर्धन करणे आवश्क असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे आणि हे नूतनीकरण करताना या हेरिटेज वास्तूला कोणताही धक्का लावण्यात येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -