Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाचे आंदोलन

Photo : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाचे आंदोलन

Subscribe

भारतीय जनता पार्टीने शनिवारी ओबीसींचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईतील लालबाग येथे जोरदार निदर्शने केली. याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपाने केली.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच योगेश सागर, संजय उपाध्ये यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisement -

मोदी आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल गुजरातच्या सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.

राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेले वक्तव्य हे ओबीसींचा अवमान करणारे आहे. ओबीसींच्या सन्मानाकरता भाजपाने हे आंदोलन पुकारले होते. राहुल गांधी यांनी ओबीसी समाज आणि देशाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

- Advertisment -