भाजपाचा धुळवडीचा उत्साह… देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार सहभागी

राज्यात गेले सुमारे आठ महिने राजकीय शिमगा सुरूच आहे. परंतु आज, मंगळवारी सत्ताधाऱ्यांमध्ये धुळवडीचा जास्त उत्साह पाहायला मिळाला. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब धुळवड साजरी केली. तर, मुंबईत भाजपाने साजऱ्या केलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते.

जुहू येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच भाजपा नेते मोहित कंबोज उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुंबईकरांचा उत्साह देखील पाहायला मिळाला.

अन्य एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भाजपाचे राष्ट्रीय संघटन सचिव शिवप्रकाश, आमदार आशिष शेलार, कृपाशंकर सिंह, खासदार मनोज तिवारी, डॉ. संजय पांडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या धुळवडीच्या उत्सवात पत्रकारही सहभागी झाले होते. आता उद्यापासून (बुधवार) विधिमंडळ अधिवेशनात प्रत्येक जण आपापले रंग दाखवायला सुरुवात करेलच.