CDS बिपिन रावत यांच संपूर्ण कुटुंबच होतं देशप्रेमी

CDS Bipin Rawat wife Madhulika Rawat was president of Army Welfare Association
CDS बिपिन रावत यांच संपूर्ण कुटुंबच होतं देशप्रेमी

भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. तमिळनाडूयेथील कुन्नूर येथील हवाई दलाचे मिग 18V5 हेलिकॉप्टर क्रँश झाले. बिपिन रावत यांच्यासोबत या अपघातात त्यांच्या पत्नी मधूलिका रावत आणि इतर १३ लोकांचा देखील मृत्यू झाला आहे. बिपिन रावत यांच्या पत्नी त्यांच्यासोबत वेलिंगटनमध्ये आयोजित असलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मात्र परत येताना कुन्नूरच्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टर क्रँश होऊन मोठा अपघात झाला आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. बिपिन रावत यांना ३१ डिसेंबर २०१९ रोजी भारताच्या पहिल्या सीडीएस पदी नियुक्त करण्यात आले होते.

दिवगंत भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ पुरी, गढवाल, उत्तराखंड येथे झाला. बिपिन रावत यांचे वडिल लक्ष्मणसिंह रावत हेही भारतीय लष्करात होते. ते लेफ्टनंट जनरलपदावरून निवृत्त झाले होते. बिपिन रावत यांचे शालेय शिक्षण कॅम्ब्रियन हॉल स्कूल, डेहराडून, सेंट एडवर्ड स्कूल, सिमला येथे झाले. त्यानंतर ते नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी, खडकवासला येथे गेले. तेथून इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहराडूनमधून त्यांनी लष्करी शिक्षण घेतले. तेथे त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ हॉनर’ हा सन्मान मिळाला होता.

रावत हे भारतीय लष्करात सर्वप्रथम ११ गोरख रायफल रेजिमेंटमध्ये १६ डिसेंबर १९७८ साली रुजू झाले. १७ डिसेंबर २०१६ रोजी त्यांची भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. ३० डिसेंबर २०१९ रोजी बिपिन रावत यांची भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ते देशाचे पहिले तिन्ही दलप्रमुख ठरले. बिपिन रावत यांच्या जाण्याने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.