Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : किल्ले रायगडावर रंगला छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा

Photo : किल्ले रायगडावर रंगला छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा

Subscribe

Shivrajyabhishek Din 2023 : किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) 350 वा राज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तिथीनुसार हा सोहळा साजरा करण्यात आला. यंदा किल्ले रायगडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर किल्ल्यावर शाही शोभायात्रा देखील काढण्यात आली. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. तर गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज यांच्या हस्ते शिवराज्याभिशेकाचा विधी करण्यात आला. किल्ले रायगडावर तत्कालीन राजदरबार उभारण्यात आला होता तसेच शिवभक्तांची उत्तम सोयही करण्यात आली आहे.वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -