मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली.

नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत सहा चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सखोल चर्चा होणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.