मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले नाना पाटेकरांच्या बाप्पाचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्याघरी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.