Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी केले होळीचे दहन

CM Eknath Shinde burnt Holi at Varsha residence

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी होळीचे दहन करण्यात आले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री निवासस्थानी ही पहिलीच होळी आहे. यावेळी होळीला पारंपरिक पद्धतीने फुलांच्या माळा घालून आणि पताक्यांनी सजवण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळीची पूजा करून होळी पेटवली. यावेळी वर्षा निवासावर सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.