आनंद आश्रमातून मुख्यमंत्र्यांच्या पिचकारीचा रोख नेमका कोणाकडे?

ठाणे शहरात सगळीकडे धुळवडीचा उत्साह असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमाला भेट दिली. मुख्यमंत्री यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करून कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी धरलेल्या पिचकारीचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा चांगलीच रंगली होती.

मुख्यमंत्री शिंदे यांना रंग लावण्याचा मोह महिला पोलीस अधिकाऱ्यालाही आवरता आला नाही. गर्दीतून मार्ग काढत महिला पोलीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना रंग लावला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांसोबत मोकळेपणाने धुळवडीचा आनंद लुटला. पोलिसांनाही रंग लावून मुख्यमंत्री शिंदे यांनी धुळवड साजरी केली.

 

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक राजेश मोरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शहरप्रमुख हेमंत पवार, टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.