घरफोटोगॅलरीमुख्यमंत्री शिंदे यांनी नातवासोबत साजरी केली धुळवड

मुख्यमंत्री शिंदे यांनी नातवासोबत साजरी केली धुळवड

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात आणि आनंदात धुळवड साजरी केली. नातू रुद्राशकडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांसोबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी धुळवडीचा आनंद लुटला.

- Advertisement -

राज्यात महायुती सरकार आल्यानंतर सर्वच सण उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाऊ लागले आहेत. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलीवंदनाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक पध्दतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुटूंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस बांधव, सर्व कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत रंग खेळले तसेच त्यांना गोड देखील खाऊ घातले. पोलिसांनीही आपलेपणाने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून रंग लावून घेत त्यांच्यासह रंगपंचमी साजरी केली.

ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -