मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कॉमन मॅन इमेजसाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. दिवाळी निमित्त ठाण्यामध्ये दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. सकाळ पासूनच शिंदे यांनी ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमांना भेटी देत होते.
शिवसेना महिला आघाडी तसेत ठाणे शहर युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटील, बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तसेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि ‘झिम्मा 2’ सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून जमलेल्या तरूणांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आपण सर्व सणांवरील निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे प्रत्येक सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. अस मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. जानेवारी महिन्यात अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. तिथे आपल्या सर्वांना जायचं आहे असे देखिल शिंदे यांनी सांगिलतं.
दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद लुटल्यानंतर भूकही लागली होती. त्यामुळे पक्षातील साथीदारांच्या सोबत जाऊन मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला. मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर बिल मुख्यमंत्री यांनी स्वत: दिलं आणि आपण कसे कॉमन मॅन आहोत हे दाखवून दिलं.
एकनाथ शिंदे यांच्या वागणूकीमुळे शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिक भारावून गेले. त्यांनी शिंदेंचा जयजयकार केला.