भारतामध्ये थायरॉइड आणि मधुमेहाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वेळीच आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यायला सुरुवात करायला हवी. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होत जाते आणि थायरॉइडमध्ये घसा बसू लागतो. अशातच हेल्थ एक्सपर्ट्सकडून काही हिरव्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. थायरॉइड आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पानं फायदेशीर मानली जातात.
थायरॉइड आणि मधुमेहामध्ये करा या पानांचे सेवन
पुदीन्याचे पान – पुदीन्याची पानं मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधापेक्षा कमी नाहीत. याचे सेवन केल्याने शरीरातील ग्लूकोज लेवल नियंत्रणात राहते.
कढीपत्त्याचे पान – कढीपत्त्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे
क्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कडूलिंबाचे पान – कडूलिंबामध्ये अँन्टी-डायबिटिक प्रॉपर्टीज असतात. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
तुळशीचे पान – तुळशीच्या पानांमध्ये स्ट्रेल हॉर्मोन कोर्टिसोलचा स्तर कमी करण्याची ताकद असते.
जैतूनचे पान – जैतूनच्या पानांमध्ये अनेक औषधी तत्व असतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.