उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लुटला बाईक चालवण्याचा आनंद
ठाणे : ठाण्यातील रेमंड कंपनीच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘रेमंड कंपनी’ आणि ‘सुपर क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऑटोफेस्ट-2025’ या ऑटो कार फेस्टिव्हलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी अनेक अँटिक दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाहण्याचा आनंद घेतला.
रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघनिया यांच्या वतीने दरवर्षी या व्हिंटेज ऑटो फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत असून यंदा या प्रदर्शनात 580 वाहने ठेवण्यात आली होती.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रिक्षा तर चालवलीच पण व्हिन्टेज कारमध्ये बसून छान फेरफटकाही मारला.
रेमंड कंपनीचे मालक आणि या प्रदर्शनाचे मुख्य अयोजक गौतम सिंघानिया, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक तसेच या अँटिक वाहनांचे मालक आणि वाहनप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिव्हेको प्युअर जिटी ही बाईक चालवण्याचाही आनंद याप्रसंगी घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रिक्षा तर चालवलीच पण व्हिन्टेज कारमध्ये बसून छान फेरफटकाही मारला.